ताज्या घडामोडी

अतिग्रे येथे नॅशनल हायवेची लोकप्रिय खासदार माननीय धैर्यशील,माने यांची प्रत्यक्ष पाहणी

अतिग्रे तालुका हातकणंगले येथे रत्नागिरी नागपूर हायवे बाबत अतिग्रे येथील बाधित शेतकरी व मिळकतदार यांचे जे निवेदन आहे त्यासाठी प्रत्यक्ष हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय धैर्यशील माने यांनी नॅशनल हायवेचे अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष अतिग्रे गावातील बाधित शेतकरी व मिळकत धारकांना भेट दिली यावेळी अतिग्रे गावातील नॅशनल हायवे कोर कमिटी यांच्यामार्फत त्यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनानुसार अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय सुशांत वड्ड यांनी माननीय खासदार व अधिकारी यांना असे सांगितले की अतिग्रे गावातील लोकांना चोकाक, माले, हेरले पर्यंत ज्याप्रमाणे नुकसान भरपाई चारपट रक्कम मिळाली त्याचप्रमाणे अतिग्रे गावासाठी ही नुकसान भरपाई चारपट मिळालीच पाहिजे तसेच अतिग्रे येथील सहा कुटुंब बेगर वसाहतीतील आहेत त्यांना योग्य ते दिलासा मिळावा अतिग्रे गावांमध्ये तलाव असल्याने त्याची दुसरी बाजू जास्त प्रमाणात बाधित होणार आहे तर त्यांना नुकसान भरपाई चा मोबदला हा जादा दराने मिळावा कारण ते शेतकरी संपूर्ण भूमिहीन होणार आहेत तसेच ब्रिज हा भरावाचा न होता तो प्लेअरचा व्हावा कारण अतिग्रे येथे एका बाजूला दवाखाना, दूध डेरी, गिरण ,किराणामाल दुकान, ग्रामपंचायत, आहे व दुसरी बाजू प्रामुख्याने प्राथमिक लहान मुलांची शाळा आहे त्यामुळे तो ब्रिज प्लेयरचा व्हावा अशी मागणी सरपंच यांनी केली
या सर्व बाबींचा माननीय खासदार साहेब यांनी विचारपूस करून असे सांगितले की जर चोकाक ,माले, हेरले पर्यंत मोबदला चारपट मिळाला पण तो अतिग्रेला का नाही आणि तो मिळालाच पाहिजे तसेच इचलकरंजी शहर मोठे औद्योगिक शहर आहे त्यामुळे येते होणारे ट्राफिक हे मोठ्या प्रमाणात आहे कर्नाटकात जाणारे ट्राफिक आहे मालवाहतूक की मोठ्या प्रमाणात आहे तर तेथे अंडर पासिंग तीन ठिकाणी आहे तर ते अंडर पासिंग वीस मीटरची व्हावे व शाळेतील लहान मुलांना येणे जाण्यासाठी सायकल टू व्हीलर पास होईल अशा पद्धतीने अंडर पासिंग व्हावा असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले तसेच जे बेगर वसाहतीतील सहा कुटुंब भूमिहीन होणार आहेत त्यांचा प्रश्न माननीय कलेक्टर साहेब यांच्याशी चर्चा करण्यात येईल व त्यांना योग्य दिलासा दिला जाईल चारपट रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एकही शेतकऱ्याची जमीन व मिळकती हस्तांतरित करण्याची नाही असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले
यावेळी उपस्थित उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 12 माननीय विवेक काळे साहेब ,राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे प्रकल्प संचालक माननीय वसंत बंदारकर साहेब, नायब तहसीलदार माननीय दिलीप खाडे साहेब, मंडळ अधिकारी हेरले बेळणेकर मॅडम, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ,तलाठी एल एस जाधव ,अतिग्रे लोकनियुक्त सरपंच माननीय सुशांत वड्ड ,पोलीस पाटील रूपाली पाटील, उपसरपंच बाबासाहेब पाटील, सदस्य भगवान पाटील ,राजेंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, नितीन पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, श्रीधर पाटील ,जयसिंग मुसळे ,आत्माराम बिडकर ,आनंदा पाटील ,संजय सूर्यवंशी, सारंग पाटील, शीलवंत बिडकर ,संदीप बिडकर , दिलीप कावणे, उदय पाटील, सचिन चौगुले, सुजित पाटील, भरत शिंदे ,संतोष कांबळे, पत्रकार भरत शिंदे,अनिल बागडे पाटील तसेच नॅशनल हायवे अतिग्रे कोर कमिटी व तसेच चोकाक गावचे नागरिक उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.