ब्रॉयलर कंपन्या आणि पशू संवर्धन प्रशासन मालामाल, मात्र कुक्कुटपालन शेतकरी दिवसेंदिवस होतोय कंगाल
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- दि. 15/4/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.दादाजी भुसे साहेब यांची नाशिक जिल्हा पोल्ट्री योध्दा संघटनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पोल्ट्री योध्दा अध्यक्ष श्री.अनिल खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी भेट घेऊन निवेदन दिलेत तसे साहेबांनी संघटनेला व उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिले, की आपल्या प्रलंबित मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन,अशी ग्वाही नामदार भुसे साहेब यांनी दिली. त्या पैकी संघटनेच्या खालील प्रमाणे काही प्रमुख मागण्या अशा होत्या..1)केंद्र सरकारने लागू केलेली गाईडलाईन महाराष्ट्र राज्याला लागू करणे 2)फीडबॅग मधील घटक त्या फीडबॅगवर छापून प्रिंट करून शेतकऱ्यांना पाठवणे बाबत सर्व कंपन्यांना आदेशाचे पालन करणे बाबत, तसेच 3)तेलंगणा राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक यांना ग्रामपंचायत करातून दिलेली सूट म्हणजेच शंभर रुपये प्रति फॉर्म तेलंगणा नुसार जीआर महाराष्ट्रात लावणे, 4) आज रोजी 45/46 डिग्री सेल्सिअस तापमान असून इतक्या मोठ्या तापमानात पोल्ट्री मधील पक्षांचे मरतुकीचे प्रमाण खूप वाढले असले तरी RD,VVND यासारखे आजार आलेले असून खूप मोठ्या प्रमाणात पक्षी मृत पावत असूनही कंपन्या पोल्ट्री मधील माल उचलण्यास टाळाटाळ करीत असतात,
असे बरेच प्रश्न मंत्री महोदय यांचेसमोर मांडलेत, तसेच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री माननीय श्री.विखे पाटील साहेब आणि माननीय श्री.तुकाराम मुंडे साहेब यांच्या समवेत झालेल्या मीटिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट गाईडलाईन हे लागू करावी तसेच खाद्याच्या गोणीवर त्यामधील घटकांची नोंद करावी असे आदेश देण्यात आले,परंतु दोन-तीन महिने उलटून देखील पशु आयुक्तालय पुणे हे कोणत्याही प्रकारे कारवाई न करता फक्त बग्याची भूमिका घेत आहेत यामध्ये असे समजते की,पशुसंवर्धन आयुक्तालय हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत की बलाढ्य कंपन्यांची पाठराखण करत आहेत असा संभ्रम सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे. या बैठकीसाठी श्री.रवींद्र कराडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योध्दा संघटना नाशिक विभाग, श्री.ज्ञानेश्वर माकुने जिल्हा अध्यक्ष, श्री.दिपक झाल्टे कार्याध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस,श्री.दीपक शेवाळे,श्री.अमोल पगार, श्री. कृष्णा शेवाळे सामाजिक कार्यकर्ते श्री.भागवत झाल्टे आदी कुक्कुट पालक उपस्थित होते.