
आपले हिंदू धर्माच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला कोटमगाव सार्वजनिक शिवजयंती मंडळाने भव्य स्टेज उभारून छत्रपती महाराजां च्या पुतळ्याचे पूजन करून आरती घेण्यात आली नंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल सेमी इंग्रजी शाळा कोटमगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,मुख्याध्यापक सरपंच, उप सरपंच, शिक्षक कर्मचारी ,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांच्या जीवनात घडलेल्या इतिहास विद्यार्थ्यांनी नाटके गायन अशा विविध कार्यक्रमातून सादर करण्यात आला. कोटमगाव ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक, सरपंच, उप सरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष ,प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामपंचायत कर्मचारी ,यांनी देखील ग्रामपंचायत मध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच यांनी पुष्पहार घालून श्रीफळ फोडण्यात आले. तसेच आदर्श माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले व विविध कार्यक्रम सादर केले सार्वजनिक कोटमगाव शिवजयंती उत्सव 2023 हा उत्साह ग्रामस्थ ,शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी ,मित्र मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी, सोसायटी कर्मचारी, सर्व कोटमगावातील मित्र मंडळ एकत्र येऊन पूजन करून महाराजांच्या घोषणा देऊन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात आज संध्याकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून दिनांक 20 -2 -2023 सोमवार रोजी संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत शिवव्याख्याते श्री डॉक्टर प्रवीण वाटोडे यांचे व्याख्यान श्री काशी विश्वेश्वर मंदिरासमोर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोटमगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2023 मित्र मंडळ यांनी केले. प्रौढ प्रताप पुरंदर ,क्षत्रिय कुलावंतसा, सिंहासनाधीश्वर ,भोसले कुलदीपक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, मुघल जनसंघाटक, श्रीमान योगी, योगीराज ,बुद्धिवंत, किर्तीवंत, गुणवंत ,नीतीवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्म धुरंधर, श्रीमंत महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी —-जय शिवाजी—- हर हर– महादेव अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच नुकत्याच झालेले शासन निर्णयानुसार राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा हे म्हणण्यात आले