अनधिकृत ऑनलाइन लोन पासून सावधान … सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ
मुख्य संपादक राहुल वैराळ

अल्पावधीत मिळणाऱ्या ऑनलाईन लोन चा तक्रारी सध्या वाढल्या आहेत.
सदर फसवणुकी मध्ये मोठया प्रमाणात तरुण वर्ग बळी पडत आहे. फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर अल्पावधीत लोन बाबत विविध जाहिराती येत असतात त्यामध्ये फसवणूक करणाऱ्या कडून गुगल प्ले स्टोअर वरून एक अँप डाउनलोड करण्यास सांगतात. ज्यावेळी आपण ते ऍप डाउनलोड करतो त्यानंतर आपल्या कडून आपल्या मोबाईल मधील सर्व माहितीचा एक्सेस घेत असतात (उदा फोन बुक, फोटो गॅलरी, लोकेशन) केवळ आधार कार्ड व मोबाईल नंबर वरील OTP वरून तात्काळ 10000 ते 15000 रु पर्यंत लोन प्राप्त होते. नागरिक घेतलेले लोन फेडतात. परंतु फसवणूक करणारे पुन्हा फोन करून अधिक पैशाची मागणी करतात. शिवीगाळ दमदाटी केली जाते. त्या नंतर सुद्धा पैसे न भरल्यास आपल्या फोन बुक मधील सेव्ह असलेल्या नातेवाईक व मित्र यांना फोन, मेसेज करून लोन घेणाऱ्यांची बदनामी केले जाते. या नंतर सुद्धा पैसे न भरल्यास फोटो गॅलरी मधील कुटुंबातील महिलांचे फोटो अश्लील मॉर्फिंग करून फोन मध्ये सेव्ह असलेल्या नातेवाईकांचे नंबर ला पाठवले जातात. किंवा दिल्ली पोलीस मधून बोलतो असे सांगून दमदाटी केली जाते. या सर्व प्रकाराला घाबरून अनेक नागरिक लोन पेक्षा अधिक पैसे भरतात. नागरिकांना आर्थिक फसवणूक तर होतेच परंतु खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे लासलगाव पोलीस स्टेशन,नासिक ग्रामीण यांचा कडून आव्हान करण्यात येते की, नागरिकांनी अशा प्रकारे कोणत्याही अल्पवधीतील लोन चा आमिषाला बळी पडू नये. नमूद अल्पवधीतील लोन अधिकृत नसून केवळ नागरिकांना फसवणुकीसाठी याचा वापर केला जातो. यापासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक
राहुल वाघ यांनी केले.