लासलगाव महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. २ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनीही एक ‘तास स्वच्छता मोहीम ‘राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे आणि महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.उज्वला शेळके, रासेयो +2 स्तर कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे आणि श्री.सुनिल गायकर, महिला कार्यक्रम अधिकारी श्रीमती लता तडवी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट बापू शेळके, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उपक्रमामध्ये सहभागी होऊन ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.सुनील गायकर यांनी केले. तसेच याप्रसंगी त्यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ देखील दिली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिन एकाच दिवशी येणे हा दुग्धशर्करा योग आहे. महात्मा गांधी यांचा देश बलवान करण्यासाठी खेडी बलवान करणे तसेच लालबहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान या संदेशाची अंमलबजावणी झाली तरच देश जागतिक सत्ता म्हणून निश्चित पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने भारत सरकारच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगून स्वच्छतेचे महत्व विशद केले. तसेच प्रत्येकाने स्वच्छतेचे व्रत अंगीकारून आपल्या आजूबाजूचा परिसर, महाविद्यालय, गाव, समाज व राष्ट्राची स्वच्छता ठेवण्यात आपला हातभार लावावा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.मारुती कंधारे यांनी केले. तर आभार श्री.देवेंद्र भांडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. आदिती बडवर या विद्यार्थीनीने पसायदान सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.