खाकी वर्दीतली माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखीत वाहतूक पोलिसामुळे अपघातात जखमी इसमाला मिळाले जिवणदान
हातकणंगले / प्रतिनीधी

खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन आपल्याला कित्येक वेळा अनुभवायला मिळते , सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद वाक्य घेऊन स्वताचा कुंटूंबाची किंबहूना जिवाचीही परवा न करता जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील माणुसकीची अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी पहायला मिळाली , आणि पुन्हा एकदा खाकी वर्दीतली माणुसकी जगजाहिर झाली . घटना आहे हातकणंगले पोलिस ठाणे हद्दीतली. अतिग्रे ते इचलकरंजी मार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलावर वयाची नव्वदी गाठलेले एक वयस्कर इसम चालत्या गाडीतून खाली पडले , त्याच वेळी त्या गाडीचे चाक त्यांच्या पायावरून गेले . त्यामुळे मोठया प्रमानात रक्तस्त्राव झाला .जखमी वयोवृद्ध इसमाला दवाखान्यात नेण्यासाठी संबंधीत रिक्षा चालक मदत मागत होता पण रस्त्यावरून येजा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांतील एकालाही जखमी इसमास मदत करू वाठली नाही हे दुर्देवच म्हणावे मात्र देव माणसाप्रमाने धाऊन आलेल्या हातकणंगले पोलिस ठाण्यांचे अम्मलदार स्वप्नील जयसिंग मोहीते यांच्या मुळेच एका वयोवृद्ध इसमाचे प्राण वाचले .
घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की , इचलकरंजी येथील विवेकानंद कॉलनी येथे राहणारे एक वयोवृद्ध दाम्पत्य नागाव येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते , दरम्यान नागाव वरुन परतताना दादासो सय्यद यांच्या एम एच ०९ ,,४२९४ या रिक्षातून परतत असताना तोल जाऊन चालत्या रिक्षातून खाली कोसळले त्यांच्या पायास गंभीर दुखापत होऊन मोठया प्रमानात रक्तस्त्राव झाला . रिक्षा चालक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून मदत मागत होते पण कुणीच मदतीला पुढे आले नाही , अखेर कुणीतरी याची खबर वाहतुक अंमलदार स्वप्नील मोहीते यांना दिली , क्षणाचाही विचार न करता मोहीते स्वतः तीथे हजर झाले
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वयोवृद्ध इसमास कुणाच्याही मदतीशिवाय रिक्षात घालुन इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय गाठले मोठया प्रमानात रक्तस्त्राव झाल्याने अपघात ग्रस्त इसमाची हालत फारच गंभीर झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले मात्र वेळेत उपचार झाल्याने संबंधीत वयोवृद्ध इसमाची तब्येत सुधारल्याचे डॉक्टरांनी सांगीतले .
खाकी वर्दीतल्या तत्परतेने आज एकाचे प्राण वाचल्याने पुन्हा एकदा खाकीतली माणुसकी अधोरेखीत झाली आहे , या कार्यतत्परतेमुळे हातकणंगले पोलिस ठाण्याचे कर्मचारी स्वप्नील मोहीते यांचे कौतुक होत आहे .