
रुकडी ता हातकणंगले येथिल कन्या विद्या मंदिर रुकडी येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेतील सहावी ते बारावी पर्यंतच्या मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, स्किल ट्री कन्सल्टिंग संस्थेमार्फत देण्यात येत आहे .
यासाठी प्रशिक्षक दीपक सुतार हे आहेत यांनी प्रजासत्ताक दिनी मुलींना स्वसंरक्षण कसे करावे व अचानक उद्भभवनारे प्रसंगी धाडसी कसे बनायचे व धाडसाने स्वसंरक्षण कसे करावे याचे चित्त थरारक प्रात्यक्षीक करून घेतले यावेळी प्रमुख अतिथी रुकडीचे उपसरपंच श्री शितल खोत ,शाळा समिती अध्यक्ष श्री धनाजी रेंदाळे, शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्री. शशिकांत पाटील ,उपस्थित होते सर्वांनी मुलींचे कौतुक केले.
सदर प्रशिक्षण योजना यशस्वीपणे अंमलात आणण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष पाटील ,गटशिक्षण अधिकारी श्री जे टी पाटील, जिल्हाप्रमुख श्री अविनाश पाटील व रमेश पिसाळ तसेच शाळेतील शिक्षक श्री शिंदे श्री जमादार व सौ मकानदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.