निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निरलेखन चा प्रस्ताव 4 वर्षांपुर्वीच पाठवीण्यात आला आहे. -तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे (पं.स. निफाड)
मुख्य संपादक राहुल वैराळ

प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथे नवीन इमारत बांधकाम साठी निधी उपलब्ध करूण देण्याची पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील व पदाधिकार्यांची मागणी…
लासलगाव…
प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथील जीर्ण झालेली इमारत निरलेखित करून पाच वर्ष उलटून देखील अद्याप जुनी इमारत पाडण्यात आलेली नाही.त्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्धतेसाठी लासलगाव शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री मा.दादा भुसे साहेब , जिल्हाधिकारी डी गंगाधरण सो, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम यांना आज समक्ष भेटून निवेदन देण्यात आले .महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून लासलगाव परिसरातील 16 गावांकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा गेली अनेक दशकापासून कार्यरत होते.परंतु गेल्या पाच वर्षा पासून आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्यामुळे निरलेखित करण्यात आली आहे.त्यामुळे लासलगाव,पिंपळगाव नजिक ब्राम्हणगाव विंचूर निमगाव वाकडा पाचोरे बुद्रुक पाचोरे खु,मरळगोई बु,वेळापुर,विंचुर,डोंगरगाव,सुभाषनगर,विठ्ठलवाडी विष्णू नगर,बोकडदरे या गावातील रुग्णांना मिळणार्या आरोग्य सुविधा बंद झाल्या आहेत.इमारत नसल्याने आंतरबाह्य रुग्ण विभाग,प्रसूती गृह,ऑपरेशन थेटर बंद आहे तसेच इमारत नसल्याने इमर्जन्सी रूग्ण सेवा मिळत नाही.त्यामुळे गरजू रुग्णांची कुचंबना होत आहे.शिवाय पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी रुग्णालयात जावे लागत आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहग मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांसाठी असणारे निवासस्थान जिर्ण झालेले आहे. त्यामुळे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी लवकरात लवकर सदरील जीर्ण इमारत पाडून नवीन बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाची मागणी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सुधीर कराड, मा.पं.स सदस्य उत्तमराव वाघ, तालुका समन्वयक केशवराव जाधव, प्रतीक काळे यांनी केली आहे.