तालुक्यातील सावरगाव येथील जय जनार्दन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड…
मुख्य संपादक राहुल वैराळ

येवला -: तालुक्यातील सावरगाव येथील जय जनार्दन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु. मयूर बाबासाहेब गायकवाड याने विभागीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा नुकत्याच नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडीयम येथे पार पडल्या या स्पर्धेत विभागातून एकूण 250 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत विद्यालयात इ 10 वी तील कु. मयूर बाबासाहेब गायकवाड या विद्यार्थ्याने नंदुरबार, धुळे, जळगाव यासह मालेगाव येथील खेळाडूना पराभूत करून राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय (बापू) कुलकर्णी, यासह संचालक सचिन पाडेकर, सुधाकर मेहेत्रे, संजय कुसाळकर यांच्यासह मुख्याध्यापक सुनिता कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजयी स्पर्धकास सचिन आहिरे या क्रीडा प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले.