
निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी हाक दिली आहे .प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही म्हणून डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली होती. पण ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाण्यासाठी ठाम आहेत बुधवारी दि.07/02 संध्याकाळी पाच वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. मात्र त्यादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.