शासकीय गावरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम कारण्याबाबाद उपजिल्हाधिकारी याना निवेदन
संपादक सोमनाथ मानकर

शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत नाशिक जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना जिल्हा प्रशासना कडून नोटीस बजावण्यात आल्या आहे. राहण्यासाठी घर नसल्याने जिल्ह्यातील गरीब, गरजू नागरिकांनी जिल्ह्यातील गायरान शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे ते कायम स्वरूपी करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघ व राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाने रणशिंग फुंकले आहे. दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश येवले यांनी श्रीराम नगर या ठिकाणी राहणाऱ्या 300 ते 400 गरीब गरजू कुटुंब येथील अतिक्रमण धारकाना नोटीसा पाठवल्याने अतिक्रमणधारक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा झाले होते. विश्वगामी झोपडपट्टी बचाओ समितीच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रदेश उपसचिव सोमनाथ मानकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. संतोष सोनवणे व विश्वगामी महिला संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले . श्रीराम नगर भाग हा मूलभूत सुविधा पासून वंचित असून आजही या भागात रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही या मुद्द्याकडे ही संतोष निकम यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल व जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक विजय केदारे, जिल्हाध्यक्ष योगेश घोलप, राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य देवीदास इंगळे, संतोष आढाव, चंद्रकला केदारे, सलीम सय्यद, भिका कामडी, बीबी शेख, पूजा शिंदे, सुशीला जोंधळे, प्रकाश माळी, मनोज जोंधळे, बबलू भिडे, जमील शेख, जयेश जाधव, पंडित भामरे, मंगल पवार, सलीम सय्यद आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट. महाराष्ट्रातील कुठल्याही गरीब बांधवास अडचण आल्यास राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व त्यातील पदाधिकारी 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे कुठल्याही अडचण असल्यास संपर्क साधा आपल्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर होतील
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम
सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही या जागेवरील घरकुले ही नियमित होतील केवळ व्यापारी व्यवसायिक कारणाने झालेल्या अतिक्रमणे काढले जातील यासंदर्भात उच्च न्यायालयात पत्र सादर करेल असे आश्वासन महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले