वेळापूर जि.प.शाळा व ग्रामपंचायत वेळापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी- दिपक गरूड

वेळापूर जि.प.शाळा व ग्रामपंचायत वेळापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
याप्रसंगी सरपंच श्री.नारायण विठ्ठलराव पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेलार सर यांनी उपस्थित ग्रामस्थांना तंबाखू मुक्त भारत याची शपथ दिली. सदर प्रसंगी चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन जोशात पार पडले.सदर प्रसंगी श्री.केदु शिंदे श्री.नारायण पालवे ग्रामसेविका.श्रीमती वाबळे श्री.गणेश ठाकरे श्री.नारायण शिंदे श्री.सागर गरुड श्री.संतोष विसे, श्री.एकनाथ कुटे श्री.गणेश फड श्री.दुर्गेश गरुड श्री.दीपक गरुड श्री.विलास गरुड श्री.भाऊसाहेब पारखे श्री.संतोष कुटे श्री.जालिंदर भागवत,भावसार मॅडम इतर ग्रामस्थ उपस्थित होते, सूत्रसंचालन श्री.शेलार सर यांनी केले