निर्मला सरस्वती सांस्कृतिक उत्सव सिनेतारका किशोरी शहाणे व अभिनेते गजेंद्रजी चौहान यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा
कार्यकारी संपादक विकास कोल्हे

सरस्वती बालक मंदिर सरस्वती विद्यामंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आयोजित होणारा निर्मला सरस्वती सांस्कृतिक उत्सव यावर्षी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे , महाभारत फेम गजेंद्र चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे, शितल झांबरे याही उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाना होळकर यांनी स्वीकारले .सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आपल्या मनोगतातून वयाच्या आठव्या वर्षांपासून एक बालकलाकार ते एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री हा प्रवास करत असताना केलेली मेहनत व अभिनयाचा रियाज , बिग बॉसच्या घरातील गोष्टी व त्यांचे चित्रपट जेजुरीला जाऊ ही त्यांची लावणी व टेलिव्हिजन वरील त्यांच्या विविध मालिका याबाबत आपल्या मनोगतातून संवाद साधला तसेच शाळातील शैक्षणिक प्रगतीचे आणि या उत्सवाचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे महाभारतातील युधिष्ठिर हे अतिशय गाजलेले पात्र साकारलेले गजेंद्र चौहान यांनी महाभारतातील संवाद सादर करत विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व सांस्कृतिक उत्सवाचे भरभरून कौतुक केले.
लासलगाव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून देत शाळेच्या प्रगतीचा आढावा व विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण अविष्कार याविषयी आपले मत मांडले. या कार्यक्रमासाठी लासलगाव चे सरपंच जयदत्त होळकर वैकुंठराव होळकर, वैशालीताई होळकर, संगीता होळकर, प्रतिभा होळकर,रेवती होळकर,योगिता पाटील , सचिव गुणवंत होळकर, संचालक बाळासाहेब बोरसे ,डॉ विकास चांदर, संदीप होळकर, दिलीप पटेल ,अरविंद होळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढाव मांडला व निर्मला सरस्वती सांस्कृतिक उत्सवाची सविस्तर माहिती दिली व मागील वर्षांचा मागोवा घेतला. उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृती दर्शन ,ऐतिहासिक ,देशभक्तीपर व रेकॉर्ड डान्स या प्रकारामध्ये नृत्याविष्कार सादर केले यामध्ये गणेश वंदना ,महाराष्ट्राची लोकधारा, राज आलं राज आलं, राणी लक्ष्मीबाई ,संभाजी महाराज, महात्मा गांधी,आई जगदंबे ,गोविंदा इत्यादी थीम प्रकार तर पुलवामा हल्ला, सोल्जर स्टोरी इत्यादी देशभक्तीपर पजाबी भांगडा ,
गोवानृत्य ,कोळीनृत्य ,राज्यस्थानी नृत्य, साउथ इंडियन नृत्य इत्यादी नृत्यप्रकार खानदेशी ,’तेरी झलक व पुष्पा,टुकुर टुकुर , मे निकला गड्डी लेके, झिंगाट, गरबा, घोडे जैसी चाल,लावणी, आजकल तेरे मेरे,खान्देशी पावरी, हुवा छोरा जवारे इत्यादी रेकॉर्ड डान्स असे विविध नृत्यप्रकारात ६७१ विद्यार्थ्यांनी कलाविष्कारांचे प्रदर्शन केले .रूपाली शिंदे, प्रदीप ठाकरे, श्रेया जोशी, यशोधन होळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.