जि.प. शाळा पिंपळस येथे दिनांक 19/3/20 24 रोजी बालआनंद मेळावा घेण्यात आला
देविदास निकम

जि.प. शाळा पिंपळस येथे दिनांक 19/3/20 24 रोजी बालआनंद मेळावा घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल लावून खाद्यपदार्थ व भाजीपाल्याची विक्री केली. त्यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व अंक मोड हे संबोध स्पष्ट झाले. बालआनंद मेळाव्यासाठी गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांचे स्टॉल वरून खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व कौतुक केले.
त्याचबरोबर बालाआनंद मिळव्याचे औचित्य साधून शिक्षकांनी 2024 – 25 या वर्षासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा घडवून आणला. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते संग्रही ठेवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प व टोपी देऊन त्या विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी आजपासूनच नियमित शाळेत यावे असे आव्हान मुख्याध्यापक व प्रशिक्षकांनी केले.
इयत्ता पहिली व दुसरीचे चार वर्ग शाळेने डिजिटल केले असून त्या वर्गांची पाहणी उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी केली. आपल्या शाळेत सेमी इंग्रजी मध्यम असून सर्व पालकांनी आपल्या शाळेत आपल्या पाल्याचे ऍडमिशन घ्यावे असे अवाहन मुख्याध्यापक श्री. बटवल सर यांनी केले.
बालआनंद मेळाव्यास चांदोरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बापूसाहेब गोसावी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी मोरे सर,पाटील सर, पालवी सर, दलाल सर, ये शी सर,जाधव मॅडम,कसबेकर मॅडम,सोनवणे मॅडम , भडके मॅडम,पैठणकर मॅडम,मोरे मॅडम,पंडित मॅडम सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन उपक्रम यशस्वी केला.