लासलगाव महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव दि.२० ( ) नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व सहकारी शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. व नंतर पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार सर यांनी गाडगे बाबांच्या जीवनचरित्रावर आधारित मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री.किशोर गोसावी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गाडगे बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. गाडगे महाराजांनी स्वत: कृतीतून गांवा-गांवातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे झाडून स्वच्छ केली व रात्री त्याच गावातील गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रध्देची, बुरसट रुढी, प्रधा परंपरेची घाण आपल्या विज्ञानवादी विचाराने किर्तनाच्या माध्यमातून साफ केली, रंजल्या-गांजल्यांची सेवा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.सुनिल गायकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.