
कोटमगाव- माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे १मे महाराष्ट्रदिन,व कामगार दिनाचे ध्वजारोहण विद्यालयाचे ज्येष्ठ व इतिहास, मराठी विषय तज्ञ शिक्षक श्री. अशोक गलांडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अनिता माणिक मढवई होत्या. प्रथमतः सरस्वती माता, व मढवई सरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक श्री गलांडे सर यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले. व वर्षभरात विद्यालयाने राबविलेल्या कार्यक्रमांचा ओघवता इतिहास सांगितला. श्री गांगुर्डे सर यांनी विद्यालयात दरमहा करीयर गाईडनस व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.ह्या व्याख्यानासाठी जिल्ह्यातील विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतील. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम यांनी विद्यालयात राबविण्यात
आलेल्या विविध उपक्रमांबद्दल शिक्षकांचे
कौतुक केले. सन २०२४/२५ ह्या शैक्षणिक वर्षापासून विद्यालयात इ.८वी. पासून सेमी इंग्रजी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यध्यापिका मढवई मॅडम यांनी घोषित केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात आले दि.१मे महाराष्ट्र दिन कार्यक्रमासाठी , बहुसंख्य विद्यार्थी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गांगुर्डे सर यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री गलांडे सर, श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर श्री कदम सर श्री दिवटे सर श्री देवढे सर, कू दर्शन ,आदित्य ,कू.सार्थक गुरगुडे, स्वयम् शिरसाठ,गणेश गुरगुडे,यश डगले,यांनी विशेष परिश्रम घेतले.