विभागीय नियंत्रक रा.प. नाशिक अरुण सिया यांच्याकडे लासलगाव बस आगारा बाबत शिवसेना तालुका प्रकाश पाटील व पदाधिकाऱ्यांची तक्रार लासलगाव बस स्थानक , डेपो मध्ये असलेल्या बसच्या संख्या वाढविणेत याव्या व नादुरुस्त बस तात्काळ रिपेअर कराव्या
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव बस आगाराची क्षमता हि ५८ बसची होती परंतु आज रोजी केवळ ३५ बसेस ह्या उपलब्ध असुन व त्यातील अनेक
बसेसची दुरावस्था झालेली आहे उदा. ब्रेकफेल,
इंजीनडाऊन होणे गाडीला हॉर्ण नसणे, गेअरबॉक्स खराब असणे तसेच स्थानकामध्ये बस चालू
होण्यासाठी प्रवाशांना धक्का द्यावा लागतो. अनेक बसेस ह्या चालु अवस्थेत असताना ब्रेकफेल होतो त्यामुळे बसमध्ये
असलेल्या प्रवाशी बांधवांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे.
सदरबाबीमुळे निफाड,चांदवड व येवला तालुक्यातून लासलगाव येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस ह्या
वेळेवर उपलब्ध नसल्याने त्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. अनेक बसेसच्या वेळापत्रकात अचानक बदल केला जातो
त्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्थाप सहन करावा लागतो. बसस्थानकामध्ये मोठ्याप्रमाणात अस्वच्छता असल्यामुळे
दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बस स्थानकात
प्रवाशी ,एसटी कामगार व नागरीकांसाठी शूध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही अशा अनेक प्रकारच्या तक्रारी विभागीय नियंत्रक अरुण सिया यांच्याकडे समक्ष भेटून करण्यात आल्या. सदर समस्या तात्काळ सोडवण्या करता आपण स्वत: सदर बाबीत लक्ष घालून आपल्या स्तरावर स्थानिक अधिकारी यांना तात्काळ
सुचना देवून लासलगाव बस स्थानक ,डेपो मधील असलेल्या अडचणी सोडवून निफाड, चांदवड, येवला तालूक्यातील व लासलगाव परीसरातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी करण्यात केली आहे .तसेच मा.मुख्यमंत्री ,तथा परीवहन मंत्री मा.एकनाथ शिंदे पालकमंत्री मा. श्री. दादाजी भुसे साहेब
यांना देखील सदर निवेदनाची प्रत पाठवून नवीन बसेस उपलब्ध करून देण्याबाबत निफाड तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील मा.प.स. सदस्य उत्तमराव वाघ तालुका समन्वयक केशवराव जाधव व पदाधिकाऱ्यांकडून मागणीकरण्यात आली आहे