कोटमगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व जागतिक हात धुणे दिवस साजरा करण्यात आला——
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर कोटमगाव

माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर जन्मदिवस कोटमगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पूजन करून अध्यक्ष स्थान स्वीकारले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री गलांडे ए. पी. सर यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली कोणत्याही संकटातून यश मिळवायचे असेल तर योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळाले तर कोणतेही आव्हाने दूर करता येतात तसेच श्री केदारे सर यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे सामाजिक कार्य विषयी व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे योगदान तसेच जीवनाचा परिचय बद्दल माहिती दिली यानंतर श्री गांगुर्डे सर यांनी जागतिक हात धुण्याचे आरोग्यासाठीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांपैकी कु रायते शिवाजी यश गुरगुडे ओमकार गांगुर्डे कू गीता गांगुर्डे कू दुर्गा गांगुर्डे कू प्रांजल जाधव कु गणेश गुरगुडे कू श्वेता पगारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले