दे भक्त जी रा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल यांचा वार्षिक स्नेसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
रुकडी / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील देशभक्त जी रा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल रुकडी यांचा वार्षिक स्नेसंमेलन कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते सुप्रसिध्द दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या कन्या सपना भालकर (जाधव) या उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात सर्व प्रथम सर्वांचं आभार मानले व शाळेचे तोंड भरून कौतुक केले आपल्या जीवनातील अनेक प्रसंग यावेळी त्यांनी शेअर केले, तसेच डॉ विजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख करून देत अनेक पुरस्कारानी सन्मानित केलेलं व्यक्तिमत्त्व आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले अभिमान वाटतो असे ही ते बोलत होते, शाळेच्या मुख्याध्यापिका तेजश्री कुंभार यांनी वर्षभरात घेतलेल्या कार्यक्रमाची उजळणी केली अनेक शाळेउपयोगी कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत असेही त्या बोलत होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, नजराणा पेंढारी रीना कांबळे,, यांनी केले, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सपना संदीप भालकर (जाधव), शंतीनाथ मगदूम, आदिनाथ किनिंगे, सचिन खोत, डॉ विजय पाटील, भरत चिंचवाडे, , क्षितिजा कुलकर्णी, मुख्याध्यापिका तेजश्री कुंभार, व्ही ए कळस्कर, एम बी कुंभार, शिक्षक वर्ग, रीना कांबळे, सोफिया मुजावर, सुप्रिया जाधव, प्रतीक्षा स्वामी, नजराणा पेंढारी, माधुरी परीट, गायकवाड मॅडम,सारिका सुतार, मानसी पाटील, विजय चींचवाडे, कृष्णात माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.