ताज्या घडामोडी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नवनिर्वाचित खासदार श्री.भास्कर भगरे (सर) विजयी तर,केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा दारुण पराभव

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना कांदा प्रश्नामुळे पराभूत व्हावे लागले.भारती पवार यांची कामगिरी दिंडोरी मतदारसंघात फार उत्कृष्ट नसली तरी,असा लाजिरवाणा पराभव व्हावा इतकी खालावलेली पण नव्हती,पण त्यांना जेव्हा केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळाले तेव्हा त्यांचे मतदारसंघात पूर्णपणे दुर्लक्ष झाले.आणि मतदारसंघातील असलेल्या जनतेशी त्यांची नाळ पूर्णपणे तुटली गेली.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मुख्य पीक म्हणजे कांदा या कांद्याबाबत केंद्र शासनाने वेळोवेळी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे जसे कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क,निर्यात बंदी यासारख्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचा केंद्र शासनावर रोष तयार झाला.कांदा प्रश्नाबाबत शेतकऱ्यांचा केंद्र शासनावर असलेला रोष आणि त्यामुळे भारती पवारांचा पराभव झाला.आणि तोच प्रश्न आता नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे (सर )यांना सतवणार आहे.त्यामुळे भगरे सरांना मतदार संघातील जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून या सर्व प्रश्नांबाबत संसदेत आक्रमकपणे आवाज उठवावा लागणार आहे.तरच येणारा काळ नवनिर्वाचित भगरे (सर) यांना सुखकर होईल, असे वाटते.

महाराष्ट्र 2024 सार्वत्रिक लोकसभेच्या 48 मतदार संघातील विजयी खासदार खालील प्रमाणे…

१) दक्षिण मुंबई –अरविंद सावंत – ठाकरे गट

२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट

३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट

४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट

५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट

६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट

७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट

८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट

) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट

१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट

११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट

१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट

१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट

१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट

१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट

१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप

१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस

१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस

१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस

२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस

२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस

२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस

२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप

२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस

२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप

२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस

२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस

२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस

२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप

३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस

३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट

३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट

३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप

३४) बीड – पंकज मुंढे– भाजप (आघाडीवर)

३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट

३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट

३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप

३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट

३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट

४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप

४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप

४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप

४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष

४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार

४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे

४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे

४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.