रुकडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोफत सुशिक्षित बेरोजगार शिबिर उत्साहात संपन्न

( रुकडी ग्रामपंचायत १४ व्या वित्तयोगतून तसेच सरपंच राजश्री संतोष रुकडिकर, उपसरपंच, राजकुमार आनंदराव मोहिते व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला)
रुकडी :- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे १४ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून व सरपंच,उपसरपंच आणि सर्व सदस्य यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला या मोहिमेतून अनेक बेरोजगाराना रोजगार करण्याची संधी मिळाली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन डॉ सनतकुमार खोत यांच्या हस्ते करण्यात आले, फोटोपुजन सरपंच सौ राजश्री रुकडीकर, यांच्या हस्ते करून , जे के गायकवाड व राहुल माने यांच्या हस्ते फोटो पूजन करून सुरुवात केली यावेळी उपस्थित सरपंच यांनी आपल्या भाषणात सांगितले महिलांनी स्वावलंबी बनून स्वयंरोजगार निर्मिती करावी असे मनोगत व्यक्त केले, तसेच डॉ सनतकुमार खोत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना बोलले अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच महिलांनी स्वावलंबी बनून स्वयंरोजगार बनावं तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून जगाला दाखवून दिले पाहिजे आम्ही कुठे कमी नाही आहोत येणर्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी अमची आहे आहे. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, जे के गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पप्पू मुरूमकर, राहुल माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, व मैत्री ग्रूप च्या भारती गायकवाड, इतर महिला सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.