के के वाघ ज्युनिअर कॉलेज येथे वाणिज्य विभागासाठी करियर मार्गदर्शन
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर

के के वाघ जुनियर कॉलेज काकासाहेबनगर येथे वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी या विषयावर इयत्ता अकरावी व बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सी.ए क्षेत्रातील करिअर या विषयावर सी.ए *कुणाल कटारिया* यांनी मार्गदर्शन केले. अकरावी व बारावी वाणिज्य शाखेत असतांनाच सीपीटी परीक्षेची तसेच बारावीनंतर अथवा पदवीनंतर सी.ए ची तयारी कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बारावी नंतर वाणिज्य शाखेतील व्यवसाय व उद्योग क्षेत्रात नवनवीन करिअरच्या संधी निर्माण होत असल्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी पालकच आपल्या पाल्याचा निर्णय घेतांना दिसतात, तसेच विज्ञान शाखेला कायम वरचढ मानले जाते परंतु आज विज्ञान शाखेपेक्षा पेक्षा वाणिज्य शाखेला अधिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद कदम व वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अतुल गवारे उपस्थित होते.
प्रा. योगेश पुंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत श्री. कुणाल कटारिया यांचा परिचय करून दिला. विद्यार्थिनी शितल उशीर व प्रणिता कुयटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. किरण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळीऐश्वर्य पाटेकर, विकास शिंदे, गणेश आवारे, सचिन कोल्हे, उत्तम कर्वे, सोनाली आढाव, भाग्यश्री खराक, संदीप शिंदे, शदाब शेख, निलेश आहेर, मिलिंद पवार, प्रा. फडे, मुक्त मोरे, अभिजित पवार, योगेश खैरे आदी उपस्थित होते.