ताज्या घडामोडी

टाकळी विंचूर गावचा आदर्श ग्रुप टाकळी विंचूर आला मदतीला धाऊन 

संपादक सोमनाथ मानकर

तालुका निफाड टाकळी विंचूर येथील व्हाट्सअप वरती तयार केलेला वर्ग मित्रांचा आदर्श ग्रुपचा खरंच आदर्श घेण्यासारखा आहे कारण या ग्रुप मध्ये जे तरुण वर्ग आहेत तो अतिशय उत्साहाने काम करत असून टाकळी गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रा सह महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कसे जाईल याकडे लक्ष आहे ह्या आदर्श ग्रुप मधील मुले दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे कोणाला ना कोणाला मदत करत असतात त्यामुळे थोड्या दिवसांमध्ये हा आदर्श ग्रुप टाकळी विंचूर नावा रुपाला आला या ग्रुप मध्ये जे तरुण पिढी आहे ते आपल्याकडून दुसऱ्याला कार्य कसे करता येईल किंवा एखाद्याला मदत कशी करता येईल दिवसभर हीच धडपड चालू असते आणि ही धडपड करत असताना या ग्रुपमधील काही व्यक्तींच्या कानावर असे आले की कोरोनाच्या काळामध्ये काही आशा वर्कर्स ह्या दिवसभर विना अन्न पाण्याच्या प्रत्येकाच्या घरोघर जाऊन तपासणी करत होत्या या तपासणी करत असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा ते करत होत्या कारण ज्यावेळेस कोरोणा झाला त्यावेळेस आपले घरचे लोक सुद्धा आपल्याला बघत नव्हते परंतु आशाताई त्यांना गोळ्या औषध देणे ॲम्बुलन्समध्ये बसवणे दहा दिवस त्यांची सेवा करणे घरी आल्यानंतर परत यांची व्यवस्थित तपासणी करणे त्यांना कशाप्रकारे व्यवस्थित राहता येईल याची चौकशी करणे अशा प्रकारचे काम ते करत होते म्हणजे त्यावेळेस आशा वर्कर यांना देवदूत म्हणणे वावगे ठरणार नव्हते अशा वर्कर जे आहेत त्यांना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडून त्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रोत्साहन पर भत्ता एक हजार रुपये महिना ग्रामपंचायती ने द्यावें असे आदेश यांना देण्यात आले होते परंतु महाराष्ट्रातील अशा अनेक ग्रामपंचायती आहे की त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिलेला आदेशाला केराची टोपली देऊन त्यांचा अपमानच केला आहे अशा ग्रामपंचायतींना कशाप्रकारे आदेश देणार व आशा वर्कर यांना पैसे मिळणार का ?असा सर आता अशा वर्कर्स मधून येऊ लागला आहे असं असताना टाकळी विंचूर येथील तरुण पिढी ज्यांनी आदर्श ग्रुप नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला त्या ग्रुप वरती माहिती टाकण्यात आली की आपल्या टाकळी गावातील जे आशा ताई आहे त्यांना दोन वर्षापासून पैसेच मिळालेले नाही

 

अशा प्रकारची माहिती मिळताच सर्व तरुण पिढी एकत्र येत सरपंच उपसरपंच यांना धारेवर धरून त्या आशा वर्कर याचा दोन वर्षाचा कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रोत्साहन पर भत्ता जो ग्रामपंचायत मध्ये थांबवलेला आहे तो त्वरित त्यांना द्यावा अन्यथा आदर्श ग्रुप यांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले अशा वेळेस टाकळी ग्रामपंचायत सरपंच अश्विनी जाधव व उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे यांनी त्वरित मागणी मान्य करून लवकरच आशा वर्कर्स यांना त्यांच्या सर्व पैसे देण्यात येईल असे मान्य केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.