सप्तशृंगी गड देवी संस्थांच्या वतीने भाविकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे
संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य पीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी देवी संस्थाने गडावर येणाऱ्या भाविकांना नियम लावलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू ने परत आपले तोंड वरती काढल्यामुळे होणाऱ्या घटनांना रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भीय सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे हेतूने मास्कचा वापर बंधनकारक केला असून गर्दी टाळणे बाबत आदेशीत केले असल्याने *श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड* द्वारे भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक करत असून गर्दी टाळणे बाबत जाहीर आवाहन करत आहे. पर्यायी *दि. २३/१२/२०२२* पासून भाविकांनी केंद्र व राज्य शासनाचा प्राप्त सूचनेनुसार विश्वस्त संस्थेच्या व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य देवू करून *मास्कचा वापर* करूनच श्री भगवती दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रवेश करून *गर्दी टाळणे हेतूने सामाजिक अंतराचे पालन* करावे तसेच बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
*कोविड-१९ च्या संसर्गाला घालूयात आळा, मास्कचा वापर करून गर्दी अवश्य टाळा…!*
चौकट..श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती येणाऱ्या भाविकांना देवी संस्थांच्या
वतीने आव्हान करण्यात येत आहे की भाविकांनी आपल्या स्वतःची काळजी व्यवस्थित घ्यावी व मास वापरावे अशी विनंती करण्यात येत आहे
देवी संस्थान विश्वस्त व पदाधिकारी