ज्ञानकौशले बहूउद्देशीय ट्रस्ट संचालित वात्सल्यगृह आधार आश्रम वणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन
वैभव गायकवाड

वणी- वात्सल्यगृह आधार आश्रम वणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाले,या कार्यक्रमाप्रसंगी पकार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ दीपाताई ब्रह्मेच्या उपस्थित होत्या, विशेष उपस्थिती कवी देवदत्त चौधरी उपस्थित होते, याप्रसंगी दीपाताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले, समाजातील प्रत्येक व्यक्तीने अनाथ मुलांसाठी / तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थांसाठी आपल्याला जे शक्य असेल ती मदत करावी,असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच कवी देवदत्त चौधरी यांनी सत्य आणि आजच्या परिस्थिती तरुण युवा पिढी यावरती विविध कविता आपल्या मनोगतातून प्रेक्षकांपुढे अतिशय सुंदर आणि त्यांच्या बोलीभाषेत सांगितल्या, आश्रमातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम/ गाण्यांचे सादरीकरण केले,तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या आरोग्य सेविकेचा सत्कार करण्यात आला,तसेच वणी पोलीस स्टेशनचे पोलीस चव्हाण यांचा ही सत्कार करण्यात आला ,याप्रसंगी वणीतील सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ सोनवणे हे उपस्थित होते,आश्रमातील संचालिका सौ कौशल्या पवार, श्री ज्ञानेश्वर पवार, डॉ. मधुकर आचार्य सौ आचार्य डॉ.प्रतीक्षा पवार,गणेशदादा कडाळे, जिजाबाई चौधरी आम्रपाली ओढणे, हेमंत पाटील रविकांत गांगुर्डे मंगला गांगुर्डे गणेश पैठणै, तसेच वणी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच परिसरातील मुले मुली,बांधव महिला -भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते