मंगरूळ ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा शुभारंभ
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली. यामध्ये ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील अशा महिलांना प्रत्येकी 1500/- रुपये महिन्याला मिळणार आहे. त्यासंदर्भात चांदवड देवळा तालुक्याचे आमदार माननीय श्री. राहुल दादा आहेर यांनी मंगरूळ गणातील सर्व बहिणींना या योजनेची सविस्तर माहिती मिळावी आणि या योजनेसाठी फॉर्म भरताना मार्गदर्शन मिळावे या करिता मंगरूळ येथील रेणुका लॉन्स येथे शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड संचालक डॉ.आत्माराम कुंभार्डे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, बालविकास अधिकारी श्री.सचिन शिंदे, श्री.योगेश ढोमसे, श्री.शांताराम भवर, श्री.सुनील शेलार, श्री.विजय धाकराव, श्री.गणपत ठाकरे, श्री.गोरख ढगे, श्री.सुभाष पुरकर, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.दौलतराव आहेर, श्री.शरद ढोमसे, श्री.अरुण देवढे सर, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.पवन जाधव, श्री.श्रीहरी ठाकरे, केशव खैरे, मिलींद खरे, श्री.अमर मापारी, श्रीमती.गीताताई झाल्टे तसेच आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी व मंगरूळ गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.