चांदवड देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा रक्कम मिळणार – आमदार डॉ. राहुल दादा आहेर
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्तरीत्या सर्व शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा उपलब्ध करून दिलेलाआहे.सुरुवातीला शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी स्वखर्चाने विमा रक्कम भरावी लागत होती,पण आता शासन विमा हत्याची रक्कम स्वतः भरते. मागील खरीप हंगामामध्ये पिक विमा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 91 हजार 599 इतक्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. त्यामध्ये देवळा तालुक्यातील ३६१२७ आणि चांदवड तालुक्यातील ६१४७६ शेतकरी सामील होते. गेल्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे शेती उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा भरपाईस पात्र असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 91 हजार 599 विमाधारकांचे 853 कोटी 23 लाख 88 हजार 691 रुपये नुकसान भरपाई येणे बाकी आहे. त्यामध्ये चांदवड तालुक्यातील ६१४७६ अर्जदारांचे 104 कोटी 5 लाख 33 हजार 33 रुपये,तसेच देवळा तालुक्यातील 36 हजार 127 अर्जदारांचे 57 कोटी 84 लाख 95 हजार 411 रुपये ही रक्कम द ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनी देण्यास तयार झाली आहे. विमा कंपनीचा देय हप्ता शासनाने जमा केलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चांदवड देवळा तालुक्यातील सर्व पीक विमाधारक शेतकरी पिक विम्यास पात्र आहे व कोणीही शेतकरी या पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, तरी या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम लवकरच मिळणार आहे, असे चांदवड देवळा तालुक्याचे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी सांगितले.यासाठी वेळोवेळी पिक विमा कंपनी व शासनाकडे स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.