आदर्श माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे आज शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी——-
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

आदर्श माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. केदारे मगन त्रंबक (सर)हे होते. याप्रसंगी प्रथमतः शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मग आरती करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जिवणकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.त्यात. कु प्रणिती साप्ते, प्राची देवरे, दुर्गेश्वरी गांगुर्डे समीक्षा पवार,कृष्णा रसाळ
तर. शिवरायांच्या गौरव गीतावर कु. महेक मुलांनी, इ १०वी. , कु.श्वेता,प्राप्ती,सृष्टी.,प्राची,प्राजल,समीक्षा,राजेश्वरी, कोमल, गुणगुण डांगे यांनी दैवत छत्रपती ह्या गीतावर समुहनृत्य केले
कु. गायत्री वैद्य व विद्या पवार यांनीही नृत्य सादर केले.याप्रसंगी इतिहासतज्ञ शिक्षक श्री गलांडे सर यांनी सुरतेच्या छाप्याचा प्रसंग सांगितला. सूत्रसंचालन i १०वी कू. श्रुती गायकवाड, कू,वैष्णवी गुरगुडे यांनी केले . अध्यक्षिक भाषणातून श्री. केदारे सर यांनी शिवरायांची अनमोल शिकवण सांगितली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर, श्री केदारे सर, श्री गांगुर्डे सर, श्री दिवटे सर, श्री देवढे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.