दुष्काळी चांदवड तालुका पाणी प्रश्नाबाबत सर्वपक्षीय मार्गदर्शन बैठक आणि चर्चासत्राचे आयोजन
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी प्रश्न, कायम दुष्काळी हा शिक्का चांदवड तालुक्यावर पडलेला आहे.गेले ४०/५० वर्ष पाण्यावर बऱ्याच निवडणूका पार पडल्या, परंतु हा प्रश्न सुटलेला नाही. यासाठी उशीरा का होईना परंतु तालुक्यातील जनता जागी होतेय याचा आनंद होतोय.
ज्यांना यामध्ये राजकारण वाटतेय त्यांनी बाजुला राहावे परंतु खोडा घालण्याचा प्रयत्न करु नये. असे आवाहन सर्व चांदवड तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त जनतेने केले आहे.
यासाठी संपूर्ण तालुक्यातील सर्व शेतकरी,सर्व पक्षीय नेते,आजी माजी सर्व पदाधिकारी, सर्व सामाजिक कार्यकर्ते,सर्व शेतकरी, तरुण वर्ग तसेच सर्व पत्रकार बंधू यांना तालुक्याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, येणाऱ्या १ सप्टेंबर २०२४ रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व दुष्काळ ग्रस्त तालुक्याच्या वतीने आपण सर्वांनी या बैठकीत उपस्थित राहुन पुढील दिशा ठरविण्यासाठी व पाणीप्रश्न लढा उभारण्यासाठी आपले मुद्देसूद विचार मांडावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
अभि नहिं तो कभी नहीं |
चांदवडकर खडा तो सरकार खडा ||
दिनांक १ सप्टेंबर २०२४
सकाळी ठिक १०:०० वाजता
ठिकाण- शासकीय विश्रामगृह गणुर चौफुली चांदवड.