जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे इयत्ता पहिलीच्या शैक्षणिक सत्र सण 2024-25 च्या इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थींसाठी शाळेतर्फे विद्यार्थी आणि पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यासाठी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी रिबन कापून मेळाव्याचे उद्घाटन केले.
यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ.बछाव मॅडम आणि सौ.गायकवाड मॅडम यांनी इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
या मेळाव्या दरम्यान नवीन विद्यार्थ्यांचे वजन उंची घेऊन,वर्गातील खेळणी,अभ्यास उपयुक्त फलक,संख्या वाचन इत्यादींची माहिती देण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी”शाळेतले पहिले पाऊल”नावाचे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना शाळेपूर्व अभ्यासपूर्ण तयारी करण्यासाठी दिले व त्या पुस्तकाचे संपूर्ण माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली यावेळी मेळाव्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रवींद्र पोटे,श्री.किरण मोरे,श्री.दीपक गवळी,श्री.ज्ञानेश्वर पोटे,श्री.रणजीत सोमवंशी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.पवार सर,श्री.गवळी सर,सौ.गायकवाड मॅडम सौ. बच्छाव मॅडम आधी सर्व जण उपस्थित होते.