लासलगाव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव:- आज १२ जानेवारी युवा दिनानिमित्त नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने झाली. महाविद्यालयाच्या गेट पासून रंगमंचापर्यंत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक याप्रसंगी काढण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचे विचार आपल्या भाषणातून मांडले. शिक्षकांमधून पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार आणि श्री किशोर गोसावी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री देवेंद्र भांडे, श्री सुनील गायकर, क्रीडा शिक्षक श्री गणेश जाधव यांनी केले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार, श्री किशोर गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री देवेंद्र भांडे, श्री सुनील गायकर, क्रीडा शिक्षक श्री गणेश जाधव तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.