
नाशिक इगतपुरी महामार्गावर विल्होळी जवळ राजुर फाटा येथे पंजाबी ढाब्याजवळ दिवसाढवळ्या शुक्रवार (१०)रोजी एका महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू ची हत्या करण्यात आल्याची मोठी बातमी आहे .भूषण दिनकर लहामगे (40 )असे हत्या झालेल्या कुस्तीपटूचे नाव आहे. भूषण हा सकाळपासून काही कामाकरता नाशिक येथे आला होता . व काही बाजार करून व शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हसी साठी पीठ घेऊन तो आपल्या दुचाकीवरून आपले गावी सालेगाव येथे जात असताना रस्त्यात दोन मारेकरी हे दुचाकी क्रमांक एम एच 15 इ 76 74 वर आले, व दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दवा दळून बसले होते, त्यांनी भूषणला रस्त्यात अडवून पहिले त्याच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या व नंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले व दुचाकी सोडून ते इगतपुरीच्या दिशेने प्रसार झाले. यात भूषणचा जागीच मृत्यू झाला. भूषण हा इगतपुरी तालुक्यातील कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता त्याने जिल्हास्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिक पटकावले होतेऋ . हत्ये नंतर वाडीवरे व ग्रामीण पोलीस घटनास्थळी हजर झाले व भूषणचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवाविच्छेदन करिता आणण्यात आला दरम्यान भूषण चे नातेवाईक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.