लासलगाव-मनमाड रोडवर रायपूर खंडेराव मंदिराजवळ अपघातात मनमाडच्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
ज्ञानेश्वर पोटे

मनमाड-लासलगाव रोडवर रायपूर येथे खंडेराव मंदिराजवळ मोटरसायकल व इको कार गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मनमाडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील श्री.साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले,दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले,प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे मनमाड शहरावर शोककळा पसरली याबाबत सविस्तर वृत्त असे की,मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 व त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय 21 हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी ए 8286 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूर कडे निघाले होते याच वेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक एम एच 19 डी व्ही 73 94 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली या धडके पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले.या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
मनमाड-लासलगाव महामार्गाची रुंदी वाढवावी,शहरात सर्वत्र झपाट्याने महामार्गांची वाढ होत आहे यात अनेक दुरगती महामार्ग चार पदरी करण्यात आली आहे,मात्र मनमाड-लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे,या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे.यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.