कळवण बस स्थानकातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे चालू करा. आदिवासी संघटनांचे आगार प्रमुखांना साकडे.
अभोणा प्रतिनिधि / खुशाल देवरे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगार स्थानक परिसरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी कळवण तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कळवण आगार प्रमुखांना दिले निवेदन.
कळवण तालुका नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका असून. तालुक्यातील खेडोपाड्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात. तसेच कळवण हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असल्याने, कळवण बस स्थानक हे नेहमी चाकरमान्यांची गजबजलेले असते. या मूळे या बसस्थानक बर्याचदा चोरीचे प्रकार देखील घडले आहेत. कळवण शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कळवणला येण्यासाठी व परत घरी जाण्यासाठी महामंडळाच्या बसेस हाच एकमेव पर्याय आहे. यामुळे या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थीनी जमतात. याचाच फायदा घेऊन या बस स्थानकात टवाळखोर देखील येतात आणि आदिवासी विद्यार्थीनींशी छेडछाड करतात यातून काही वेळा विद्यार्थी व टवाळखोर यांच्यात वाद देखील होतात. या बाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी आदिवासी संघटनांकडे केली होती. बस स्थानकातील कॅमेरे बंद असल्याचे टवाळखोरांना माहिती असल्याने ते याचा फायदा घेत मुलींची छेड काढणे, मुलांशी भांडणे करणे असे प्रकार करतात.
कळवण आगार परिसरात घडणारे गैरप्रकार बंद व्हावे व अशा घटनांवर आळा बसावा यासाठी आज महाराष्ट्र राज्य
आदिवासी शक्ती सेना,
भारतीय अस्मिता पार्टी
सत्यशोधक बहुजन आघाडी
आदिवासी बचाव अभियान, आदिवासी रावण साम्राज्य.
इ.आदिवासी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कळवण आगार प्रमुखांना बसस्थानक परिसरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर कार्यान्वित करावे या आशयाचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सुदाम भोये, चिंतामण गायकवाड, सोनिराम गायकवाड, पुंजाराम खांडवी, विशाल जोपळे व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
चौकटीत:
“कळवण तालुक्यातून तसेच कळवण तालुक्या बाहेरून मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी कळवणला शिक्षणासाठी येतात. यावेळी कळवण बसस्थानकात काही अराजकतत्वे बसस्थानकात येऊन बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फायदा घेऊन बसेसची वाट पाहणार्या विद्यार्थ्याना नाहक त्रास देतात. तेव्हा आगार प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालू करावे , जेणेकरून टवाळखोरांना चाप बसेल.”
प्रतिक्रिया
सुदाम भोये
आदिवासी शक्ती सेना कळवण ता. प्रमुख