धुळे येथील कापडणे गावातील दुर्दैवी घटना शेतकऱ्यासह दोन्ही बैल मृत्यूमुखी
ज्ञानेश्वर पोटे

दिनांक 12/6/2024 रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील शेतकरी आणि शेतकऱ्याचे दोघे बैल इलेक्ट्रीक विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याची दु:खद घटना घडली.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत,शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीच्या अथवा बोरवेलच्या विद्युत पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक वायर पसरवलेली असतात तिथे वायर जॉईंट/कट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होवुन आजूबाजूच्या परिसरात करंट उतरलेले असते, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या ईलेक्ट्रीक मोटरच्या पेटी जवळ किंवा वायर जवळ जाताना काळजी घ्यावी,जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही.
प्रत्येक गावातील प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर असे सतर्कतेचे मेसेज फॉरवर्ड करावे जेणेकरून शेतकरी सावधान होतील, आणि अशी दुर्दैवी घटना घडणार नाही,असे आवाहन पोलीस टाईम्स न्यूज चॅनेल 24×7 व चॅनेल चे मुख्य संपादक श्री.राहूलजी वैराळ सर यांच्या वतीने करण्यात येत आहे.