औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी रोजगार मेळावा
नाशिक प्रतिनिधी
नाशिक – महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा *नवरचना विद्यालय कंपाऊंड, मते नर्सरी रोड ,वीर सावरकर नगर ,गंगापूर रोड ,नाशिक* येथे शुक्रवारी ता. 14 सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत होणार आहे .मेळाव्यासाठी एल अँड टी ,महिंद्रा अँड महिंद्रा , किर्लोस्कर ऑइल इंजिन, फॉर्च्यूना इंजीनियरिंग, सिमेंस अल्फा इंजीनियरिंग, गॅब्रियल इंडिया, वैभव एनर्जी, फेबॉन इंजीनियरिंग या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील द्वितीय वर्षात शिकणाऱ्या आयटीआय पास झालेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आव्हान महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित आयटीआय ने केले आहे. मेळाव्यासाठी किमान पात्रता , आयटीआय ट्रेड पास व नापास, पद – अप्रेंटिसशिप ,ट्रेनिंग, ईपीपी ,वयोमर्यादा 18 ते 30 ,विद्यावेतन प्रति माह 10,000 ते 20,000 कंपनी निहाय विविध सुविधा उपलब्ध आहेत .अधिक माहितीसाठी – 93 22 37 54 22 , 98 22 02 76 40 , 99 60 00 65 47 संपर्क साधावा.