
लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे होते तसेच उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, क्रीडा अधिकारी डॉ.नारायण जाधव, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य सत्तार शेख सर, प्रा.सुनिल गायकर, प्रा.गणेश जाधव, अक्षय आंबेकर इ. उपस्थित होते. सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. मेजर ध्यानचंद यांनी ज्या समर्पित भावनेने खेळासाठी स्वतःला झोकून दिले तशी समर्पणाची भावना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी भीनवावी असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी केले. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.किशोर अंकुळणेकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते, म्हणून आपण दररोज भरपूर खेळलेच पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात किक बॉक्सिंग, मैदानी स्पर्धा, दोर उडी, बुद्धिबळ, सॉफ्टबॉल स्पर्धा आणि कब्बडीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. किक बॉक्सिंग या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसाद आनंदा गायकवाड, द्वितीय क्रमांक सुजित सुरेंद्र प्रसाद तर तृतीय क्रमांक अक्षय दत्तू काळे या विद्यार्थ्यांनी मिळवला तर 1500 मीटर मुलांच्या मैदानी स्पर्धेत गोपाल प्रकाश कानडे प्रथम क्रमांक आणि गोरख शिवाजी जेउघाले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 200 मीटर मुलांच्या मैदानी स्पर्धेत सचिन धर्मनाथ मघाडे प्रथम क्रमांक तर वेताळ आदित्य म्हसू यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 200 मीटर मुलींच्या स्पर्धेत गीते अश्विनी श्रावण प्रथम क्रमांक आणि अर्चना गोविंद टोपे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. दोर उडी स्पर्धेत वैष्णवी बाळू बैरागी यांनी प्रथम क्रमांक आणि प्रज्ञा विश्वनाथ रत्नपारखी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. बुद्धिबळ स्पर्धेत हिरे चेतन विश्वनाथ यांनी प्रथम क्रमांक आणि होळकर यशराज संजय यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सॉफ्टबॉल स्पर्धेत सिनिअर मुलींचा संघ विजेता ठरला तर कबड्डीच्या स्पर्धेत ज्युनिअर मुलांचा संघ विजेता ठरला. सर्व यशस्वी खेळाडू व संघाच्या प्रतिनिधींना याप्रसंगी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख डॉ.नारायण जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी केले तर आभार गणेश जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, आणि डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी डॉ.नारायण जाधव, प्रा.सुनिल गायकर, प्रा.गणेश जाधव, अक्षय आंबेकर आणि बाबा हारळे यांनी परीश्रम घेतले.