
कोटमगाव , खानगाव ,वनसगाव ,सारोळा, माळेगाव, थेटाळे, येथील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना रानवड व लासलगाव येथील कॉलेज हायस्कूल येथे येणे जाण्यासाठी 9.30 वा. बस सुरू करण्यात यावी अशी निवेदन कोटमगाव उपसरपंच श्री .योगेश पवार श्री. रामदास गांगुर्डे श्री संतोष गांगुर्डे श्री.हरी कडाळे श्री श्रावण काळे श्री . ज्ञानेश्वर भवर यांनी लासलगाव आगार मॅनेजर सौ काळे मॅडम यांना दिनांक 1/8/2023 यांना निवेदन दिले होते. या संदर्भात तात्काळ दखल घेऊन सौ .काळे मॅडम यांनी लासलगाव — खानगाव —- रानवड कारखाना. बस सुरू करण्यात आली. तरी सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दररोज नियमितपणे 9-15 ते 9-30 दरम्यान बस लासलगाव ला जाईल विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. उपसरपंच व कोटमगाव ग्रामस्थ ह.भ.प बाळासाहेब महाराज शिरसाट यांनी चालक श्री .तुकाराम नागरे यांना तर श्री. संतोष गांगुर्डे यांनी वाहक श्री. समीर सर यांना शाल श्रीफळ देऊन बसला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच श्री. योगेश पवार यांनी आगार प्रमुख सौ. काळे मॅडम यांच्या आभार मानले ही बस सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवा ही विनंती केली. माजी सरपंच कैलास शिरसाट, श्री .नाना कडाळे श्री. किरण पवार श्री बबन गांगुर्डे श्री .रामदास गांगुर्डे उपसरपंच श्री. योगेश पवार ह .भ. प.श्री. बाळासाहेब शिरसाट श्री. पोपट शिरसाट श्री. भाऊ कडाळे श्री. शरद बोराडे श्री. नवनाथ गांगुर्डे श्री. अशोक शिरसाट श्री .धनवंत कडाळे श्री. रमेश शेळके श्री . शाहू महाराज कडाळे श्री. हरी कडाळे श्री.बैरागी श्री. बाबुराव पेंटर श्री. शंकरराव मोरे श्री. सुरेश शिरसाट श्री .श्रावण काळे श्री .पप्पू वैद्य श्री. दीपक शिंदे पत्रकार श्री. ज्ञानेश्वर भवर तसेच शालेय विद्यार्थी या स्वागतास उपस्थित होते.