
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 18/1/2024 गुरुवार रोजी दिंडोरी तालुक्यातील तालुकास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा, जि.प. शाळा अकराळे या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील 9 बिटांनी सहभाग नोंदवला. या सर्व स्पर्धा प्रकारात विक्रमी विजय मिळवला अशी शाळा म्हणजे जिल्हा परिषद आदर्श शाळा महाजे ने आज पर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक सुरू होऊन गेल्या पंचवीस वर्षात कुणी अशा पद्धतीचा विक्रमी विजय मिळवला नाही. सांघिक मैदानी स्पर्धा––
प्रथम क्रमांक–खो खो मुले. प्रथम क्रमांक—खो खो मुली. प्रथम क्रमांक—कबड्डी मुली. वैयक्तिक मैदानी स्पर्धा,: 1) प्रकाश दौलत कोरडे 400 मी. धावणे (मोठा गट प्रथम). 2). रूपाली विलास कोंगे 200 मी .धावणे (मोठा गट तृतीय). 3) करण रघुनाथ कोंगे 200 मी धावणे (लहान गट तृतीय). वैयक्तिक नृत्य स्पर्धा—–(मोठा गट). यशोदा अतुल वायसंडे( द्वितीय ). या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन सत्कार्य दिंडोरी तालुक्यातील गटविकास अधिकारी मा. श्रीमती नम्रता जगताप मॅडम, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. चंद्रभान गवळी साहेब, बीड विस्तार अधिकारी मा. श्रीमती सुजीता अहिरे मॅडम, शाळेचे कार्य कुशल कर्तुत्ववान मुख्याध्यापक मा. श्री. संजीव निकुंभ सर , ज्यांनी जून महिन्यापासून विद्यार्थ्यांची सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 4 ते 5 असे दररोज 3 तास सराव घेऊन विद्यार्थ्यांसाठी झोपून काम केले असे अष्टपैलू कर्तबगार मनमिळावू विद्यार्थी प्रिय शिक्षक मा .श्री. नामदेव जोपळे सर त्यांची योगदान लाभले. तसेच शाळेचे कर्तबगार अनुभव संपन्न शिक्षक मा .श्री. नितीन देवरे सर व सर्व शिक्षक वृंद, सेवांतर्गत प्रशिक्षक जिल्हा परिषद आदर्श शाळा महाजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीबद्दल माझे गावातील ग्रामस्थ व पालक यांनी कौतुक केले आहे.