
नाशिक ता.२५ – म.वि.प्र. समाज संस्थेचे कला , वाणिज्य आणि विज्ञान महावि्यालय त्र्यंबकेश्वर येथील प्राध्यापक डॉ भागवत शंकर महाले यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , मानव विद्या शाखा अंतर्गत नुकतीच राज्यशास्त्र विषयातील पीएच.डी (विद्यावाचस्पती) पदवी मिळाली त्या संशोधन यशाबद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते सुरगाणा येथे भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख संतोष अहिरे, प्रदेश सह संपर्क प्रमुख सोमनाथ मानकर, माहिती अधिकार प्रमुख – बाळासाहेब गांगुर्डे , राष्ट्र क्रांती न्युज चेंनल संपादक – डॉ दिनेश चौधरी , काशिनाथ गायकवाड,नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भिका कामडी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . यांच्या उपस्थित होते.
मागील महिन्यात भारतीय राजकारणातील भ्रष्टाचार आणि ते दूर करण्याचे मार्ग या शीर्षक अंतर्गत राज्यशास्त्र विषयाचे शासकीय जर्नल्समध्ये पेटंट मिळाले आहे. डॉ. भागवत महाले हे मानव विज्ञान शाखे अंतर्गत पेटंट मिळवणारे पहिले प्राध्यापक आहेत. त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित २५ व्या दीक्षान्त समारंभात
प्रा डॉ. महाले यांना राज्यशास्त्र विषयाचे संशोधन उत्तम केल्याबद्दल दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली आणि त्यांच्या कार्याबद्दल
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संतोष निकम म्हणाले की, सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्यात अचूक प्रश्न सोडवन्याचे कार्य संघटनेत होत असते, म्हणून पत्रकार बंधूंनी आपले काम प्रामाणिक करावे. नवीन संशोधन करून समाजाचे हित साधले गेले पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर भाषणात बोलताना डॉ भागवत महाले म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे . विद्यार्थ्याना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ,राजकीय प्रश्न , गंभीर स्वरूपाचे अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहे असे यावेळी बोलतांना सांगितले . त्यांच्या यशाल्याबद्दल सर्व मित्र परिवार, शिक्षण , सामाजिक, राजकीयस्तरातून खूप खूप अभिनंदन केले आहे.