मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंना कोर्टाकडून मोठा दिलासा शिवसैनिकांमध्ये उत्साह, मान्यवरांकडून सत्कार, लासलगाव येथे शिवसैनिकांनी बँड लावुन फटाके फोडून केक कापून केला आनंद उत्सव साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव : महाराष्ट्राच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने विविध मुद्यांवर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली मात्र अंतिम निकालामध्ये शिंदेंच्या नेतृत्वा खालील शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळेच सर्व पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंना शुभेच्छा मिळत आहे.
आज नाशिक येथे शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची दुपारी भेट घेऊन शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी शाल व गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत आप्पा गोडसे, आमदार किशोर दराडे ,नरेंद्र दराडे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अजय बोरस्ते, अनिल ढिकले, डॉ. विलास कांगणे , पप्पू शेठ पंजाबी, गणेश कुलकर्णी, सोनू कोल्हे, निरंजन पाटील जिल्ह्यातून असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
लासलगाव येथे सायंकाळी साडेआठ वाजता शिवसेना तालुका प्रकाश पाटील व परिसरातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. बँड लावून फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापुन जल्लोष करत आनंद साजरा केला.
गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षावरील निकालाचं वाचन केलं. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने विविध मुद्यांवर महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना शिंदे गटाला धक्का दिला मात्र अंतिम निकालामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिवसैनिक आनंद उत्सव साजरा करत आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष सुरज नाईक, राजेंद्र कराड ,संदीप उगले ,गणेश इंगळे, मयूर झांबरे, युनूस पठाण, रोहित पाटील ,मंदार खानापूरकर , रवी घोडे, धनंजय वाकचौरे ,महेश चव्हाण ,सलीम सय्यद , सोमनाथ गांगुर्डे, राजाभाऊ चाफेकर, मोहित बकरे गणेश कुलकर्णी, सिद्धेश जगताप ,अक्षय जगताप, जाधव गोकुळ कहाणे ,बंटी ठाकरे ,हिरामण सोनवणे, पंकज वाकचौरे ,श्याम भागवत ,शरद शेजवळ ,दीपक सोनवणे , रिहान शेख ,अनिल निरभवणे, करण रावळ ,अक्षय चव्हाण, सोनू जाधव, सोमनाथ पात्रे, केशव गवळी,अभिजीत शिंदे, भावेश शिरसाठ, राम जाधव ,विशाल शेजवळ ,राहुल बकरे, बापू शिंदे ,दिगंबर पाटील यांसह लासलगाव परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजय असो , एकनाथ भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी लासलगाव परिसरात शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह होता अखेर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी संघटना हे माझे शिवसैनिक व हेच काम शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व सर्व पदाधिकारी करत आहेत अशी चर्चा लासलगाव मध्ये सुरू होती