
भाटगांव- दिनांक 25/4/2024 रोजी पोलीस टाईम्स न्यूज चैनल 24/7 ने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोयी बद्दल प्रसारित केलेल्या बातमीची दखल व वन्य पशु प्राणी मित्र समाजसेवक श्री.भागवत झाल्टे कातरवाडी तालुका चांदवड यांनी वारंवार वन विभागाकडे जंगली पशु प्राण्यांसाठी पानवट्या मध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरच्या पाण्याची मागणी केली होती.त्याची वन विभागाने तात्काळ दखल घेऊन दोन टँकर पाणी टाकले,त्यामुळे वन्य प्राण्यांना जीवदान मिळाले. झाल्टे यांच्या पाठपुराव्याला यश आले त्यांच्या कार्याला सलाम प्रशासनाला कळ कळीची विनंती की,येवला तालुक्यातील सावरगाव येथे ही हरिणांसाठी व जंगली प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करावी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे व परिसरातील छोट्या मोठ्या जंगलांमध्ये वन विभागाचा सर्वे करून जंगलातील वन्य प्राण्यांच्या संख्येवरून आवश्यक त्या ठिकाणी पानवठे उपलब्ध करून द्यावे.तसेच जागोजागी कुंड्यांची निर्मिती करून द्यावी जवळ असलेले चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव स्टेशन जवळील जंगलात शंभर पेक्षा जास्त हरणांची संख्या वाढली आहे.तिथेही पाण्याची सुविधा त्वरित करावी आणि तेथील पाण्याचा साठा सध्या खराब होऊन गेल्यामुळे तेथील हरणांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर करण्यात यावी कारण,त्यामुळे कातरणी,तळेगाव समिट, वडगाव परिसरात हरणे मोठ्या प्रमाणात मानवी वाड्या- वस्तीकडे पसरत आहे.त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो झालास तर याला कोण जबाबदार राहील या मागणीची त्वरित दखल घेऊन आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी पाणवठे उपलब्ध करून देण्यात यावे व वेळोवेळी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी श्री. झाल्टें सह परिसरातील नागरिकांनी केली.या प्रकारची सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी दिली आहे.