
भाटगांव– सविस्तर वृत्त असे की भाटगांव येथील श्री.बालूकाका कुलकर्णी यांचे भाटगांव ग्रामपंचायत इमारतीस लागून राहते घर आहे.घरासमोर लावलेली त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर MH15EU 9354 गाडीचे दिनांक 28/4/2024 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटरसायकलचे पुढील व मागील दोन्ही चाके खोलून नेली,त्याचप्रमाणे या आधी पण गावातील मारुती मंदिर गल्लीतील तीन ते चार मोटरसायकलचे पेट्रोल चोरी झालेले आहे,तरी या अज्ञात भुरट्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी भाटगांव ग्रामस्थ करीत आहे.