
कळवण तालुक्यात दि २१ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता हॉटेल जेजुरवाडा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारनी बैठक जिल्हा अध्यक्ष दिपक गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली याबैठकीत तालुक्यातील पंचकृषी भागातील पत्रकार मोठ्यासंख्येने उपस्थित होते यावेळी कळवण तालुका अध्यक्षपदी चेतन हिरे ,कळवण तालुका उपाध्यक्ष इम्रान शाह ( सप्तशृंगीगड ) यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकाराच्या माध्यमातून अनेकांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तसेच बैठकीत आपआपले मत व्यक्त करत संघवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची व पत्रकारांवर हल्ले थांबवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहिल्याची ग्वाही यावेळी माध्यम प्रतिनिधींनी दिले.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपक गांगुर्डे,बापू देवरे,रवी बोरसे,सतीश कुवर,दीपक झाल्टे,तुषार बर्डे ,किरण आहिरे,राहुल पोटे,दीपक महाजन,अनिल पवार,खुशाल देवरे,पदमभूषण शहा, दीपक वाघ,आदी पत्रकार उपस्थित होते