गुरु पौर्णिमा निमित्त कोटमगाव येथे खंडेराव महाराज मंदिर भव्य दिव्य उत्सव साजरा करण्यातआली–
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर .

सविस्तर वृत्त असे की, सालाबादप्रमाणे याही वर्षी कोटमगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.गुरु आणि शिष्य यांच्यातील आदराची भावना जोपासण्याचे काम खंडेराव भक्त मंडळांनी दाखवून दिले. याप्रसंगी भक्तांनी आपल्या गुरुचे पूजन करून शाल श्रीफळ, टोपी घालून पूजन केले.
याच शुभमुहूर्ताचे औचित्य साधून कोटमगाव चे प्रगतशील शेतकरी श्री. रावसाहेब देवराम गांगुर्डे यांनी चैत्री पौर्णिमेस भरल्या जाणाऱ्या यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम केला जातो त्यासाठी बैलगाडी कोटमगाव येथील भक्त मंडळाला व खंडेराव मंदिरास अर्पण केली . कोटमगाव येथील खंडेराव भक्तांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला . याप्रसंगी सप्तशृंगी गड वणी येथील श्री.महेंद्र खरे जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांचा गायनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाची प्रेरणास्थानी श्री.काशिनाथ आप्पा गांगुर्डे श्री. भास्कर गांगुर्डे श्री.रामकृष्ण पवार श्री. रामदास गांगुर्डे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले श्री खंडू पारधी श्री.योगेश मोरे श्री. बबलू गांगुर्डे श्री.गोरख गांगुर्डे श्री. संतोष गांगुर्डे श्री. पपू पवार श्री . वाळू साप्ते श्री.शंकर मोरे असे ग्रामस्थ उपस्थित होते. अशाप्रकारे सर्व खंडेराव भक्तांनी जागरण गोंधळाचा आनंद घेतला