जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे शालेय शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या आठवड्यात शिक्षण उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यात आठवड्यातील नियोजनाप्रमाणे विविध कार्यक्रम, उपक्रम, प्रात्यक्षिके खेळ, भेटी,स्पर्धा, मुलाखती ईत्यादी घेण्यात आले.
मुलांच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम घेऊन हा शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. आज 28 जुलै रोजी गावातील पालक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत भाटगांव या सर्वांच्या सहकार्याने मुलांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर, श्री.पवार सर, श्री.गवळी सर, सौ. गायकवाड मॅडम, सौ. बच्छाव मॅडम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पोटे, उपाध्यक्षा ज्योत्स्ना सोमवंशी, आणि सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ सर्वांनी अत्यंत उत्साहात हा शिक्षण सप्ताह साजरा करण्यासाठी सहकार्य केले.