लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची………
मुख्य संपादक राहुल वैराळ

लव्ह जिहाद,धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा,श्रद्धा वालेकर या हिंदू भगिणीचा मारेकरी आफताब पूनावला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी,गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी त्याच प्रमाणे सकल हिंदू धर्माचे आराध्य दैवत भगवान श्री शिवछत्रपती महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिवर,संघटनेवर,राजकीय पक्षावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी लासलगाव मधील विविध हिंदू संघटनांच्या वतीने महंत जनेश्र्वर महाराज भारत माता आश्रम बोकडदरे,निशा पाटील भिरूडे,साक्षी भांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून शनिवारी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मागण्यांचे निवेदन लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले
विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था लासलगाव,बाबा अमरनाथ सोशल ग्रुप, सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील बाबा अमरनाथ मंदिर एस टी डेपो येथून शनिवारी सकाळी अकरा वाजता मूक मोर्चास प्रारंभ झाला.यावेळी विविध राजकीय पक्ष,संघटना मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चात महिला व युवतींचा लक्षणीय संख्येने सहभाग होता.विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगवे ध्वज,भगव्या टोप्या आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले होते.
धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा.श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब पुनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या प्रत्येक व्यक्तीवर,संघटनेवर,राजकीय पक्षावर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या मूक मोर्चाद्वारे करण्यात आल्या.छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक राष्ट्रगीतानंतर या मोर्चाचा समारोप करण्यात आला
या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता