भाटगांव आणि परिसरात झालेल्या ढगफुटी मुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला, शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी भाटगांव येथील प्रगतशील शेतकरी श्री. गणपत पुंडलिक मोरे यांचे प्रतिपादन
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड आणि परिसरात झालेल्या ढगफुटी मुळे भाटगांव, चिंचोले, परसुल, नारायणगांव, तळवाडे, भरवीर, भोयेगाव, जोपुळ आणि परिसरातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांमधील मका, सोयाबीन, कांदा, कांदा रोपे, द्राक्ष बाग वगैरे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकरी श्री. गणपत पुंडलिक मोरे, श्री. नवनाथ नथू पवार, श्री. ज्ञानेश्वर गवळी, श्री. भरत मोरे, श्री. दिनकर भवर, श्री. अण्णा भवर, श्री. अशोक गवळी आदी शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
चांदवड तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तालुक्यातील राजकारण बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. तरी महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत आणि प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी.