
सिन्नर – शहरातील नाशिक वेस्ट येथील भाजी बाजारातील अतिक्रमणे हटविणे व देवी रोड परिसरातील वाईन शॉप चे स्थलांतर करण्यासाठी शिवछावा संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता मुरकुटे यांनी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण धरले होते. त्यामुळे नगर परिषदेकडून नाशिक वेस भाजी बाजारातील अतिक्रमणे हटवून देवी रोड परिसरातील वाईन शॉप चेही महिनाभरात स्थलांतर करण्याचे आश्वासन आले. तसेच नायब तहसीलदार गांगुर्डे साहेब यांनी संगीता मुरकुटे यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिले नंतर मुरकुटे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.