
भारताचे कणखर गृहमंत्री तथा सहकार मंत्री माननीय श्री. अमित शाह जी यांनी जळगाव शहरात जमलेल्या प्रचंड मोठ्या युवा वर्गाला संबोधित केले. आजचे तरुण हे विकसित भारताच्या प्रगतीचे ध्वजवाहक असून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या प्रगतीचा मार्ग विस्तीर्ण करण्यासाठी युवा वर्गाने जास्तीत जास्त योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,ग्राम विकास मंत्री श्री गिरीष महाजन, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, ,खासदार श्री. सुभाष भामरे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार हिना गावित यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.